कोव्हिड - 19 आजचे अपडेट (01/05/2020)
l आज 220 कोरोना टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाले. त्यामध्ये 200 रिपोर्ट निगेटिव्ह आणि 20 रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त.
l आज पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 20 l एकूण पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 250
l विभागनिहाय कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या : नेरूळ - 4, वाशी - 3, तुर्भे - 7, कोपऱखैरणे - 6.
l सेक्टर 28, नेरूळ येथील रहिवाशी असणा-या मानखुर्द मुंबई येथे क्लिनीक असणा-या 39 वर्षीय डॉक्टरांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. ते 20 नियमित क्लिनीकला जात होते. 16 ते 18 एप्रिलला त्यांनी मानखुर्द भागात थर्मल स्क्रिनींगचे शिबिरही घेतले होते. त्यांस 20 तारखेला ताप येऊ लागल्यानंतर त्यांनी 28 तारखेला स्वॅब टेस्ट करून घेतली असता त्यांचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 10 कोपरखैरणे येथील रहिवाशी व मुंबईतील ताडदेव पोलीस स्टेशन येथील 30 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यांचे सहकारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची स्वॅब टेस्ट घेतली असता यांचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असून ते मुंबईतच वांद्रे येथील गुरूनानक रूग्णालयात ॲडमिट आहेत.
l सेक्टर 22 जुईनगर नेरूळ येथील रहिवाशी व मुंबईत भाऊचा धक्का, कुलाबा यलो गेट येथे कार्यरत 34 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यांचे सहकारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती म्हणून यांची स्वॅब टेस्ट घेतली असता ती पॉझिटिव्ह आलेली असून ते मुंबईतच वांद्रे येथील गुरूनानक रूग्णालयात ॲडमिट आहेत.
l सेक्टर 20, नेरूळ येथील रहिवाशी असणा-या 27 वर्षीय गरोदर महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. या महिलेच्या सासू मुंबईतून वडाळ्याहून यांच्याकडे नवी मुंबईत आल्याने त्यांची स्वॅब टेस्ट करण्यात आली होती. सासू कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती म्हणून यांची स्वॅब टेस्ट घेतली असता यांचेही कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l सेक्टर 10 ए, नेरूळ येथे रहिवाशी असणा-या व मुंबईत रे रोड येथे ग्रोसरीचे दुकान असणा-या 67 वर्षीय व्यापा-याचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. ते 22 एप्रिलपर्यंत नियमितपणे टॅक्सीने दुकानात ये-जा करीत होते.
l सेक्टर 9, कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या व मुंबईला गोवंडी येथे मस्जिदच्या बाजूला किराणा मालाचे दुकान असणा-या 34 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. ते 23 एप्रिलपर्यंत स्वत:च्या गाडीने दुकानात ये-जा करीत होते. 25 एप्रिलला ते बिल अदा करण्यासाठी एपीएमसी दाणा मार्केट येथेही गेले होते. त्यांस 28 एप्रिलला ताप येऊ लागल्यानंतर टेस्ट केली असता त्यांचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l सेक्टर 16 ए, वाशी येथील रहिवाशी असणा-या व एपीएमसी भाजी मार्केटमध्ये विक्रेते असणा-या 59 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. सदर व्यक्ती ताप येईपर्यंत 28 एप्रिलपर्यंत दुकानात जात होती.
l सेक्टर 17, वाशी येथील रहिवाशी असणा-या व एपीएमसी फळ मार्केटमध्ये विक्रेते असणा-या 73 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. सदर व्यक्तीस 28 एप्रिलला ताप आल्यानंतर त्यांनी खाजगी लॅबमध्ये टेस्ट केली असता पॉझिटिव्ह टेस्ट रिपोर्ट प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 11, कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या व एपीएमसी दाणा मार्केटमध्ये अकाउन्टन्ट म्हणून काम असणा-या 32 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. सदर व्यक्ती ताप येईपर्यंत 29 एप्रिलपर्यंत कामावर जात होती.
l सेक्टर 7, कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या व एपीएमसी भाजी मार्केटमध्ये मजूरी करणा-या एका 28 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. सदर व्यक्ती ताप येईपर्यंत 28 एप्रिलपर्यंत कामावर जात होता.
l सेक्टर 20 कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या व एपीएमसी मार्केटबाहेर फळ विक्रीचा व्यवसाय करणा-या 33 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. सदर व्यक्ती ताप येईपर्यंत 27 एप्रिलपर्यंत विक्री काम करीत होते.
l सेक्टर 21, तुर्भे येथील रहिवाशी असणारे एपीएमसी भाजीविक्रेते पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब सॅम्पल घेतले असता त्यामध्ये त्याच भागात राहणारे त्यांचे आणखी एक 44 वर्षीय मित्राचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत
l सेक्टर 6 कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या एपीएमसी मार्केटमधील किराणा दुकानाचा मालक असणा-या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या निकटच्या संपर्कातील 10 व्यक्तींचे स्वॅब सॅम्पल घेतले असता त्यामधून त्यांची 30 वर्षांची पत्नी, 78 वर्षांचे वडील, 28 वर्षांची वहिनी, 20 वर्षांच्या पुतण्या, 25 वर्षांची वहिनी, 12 वर्षांचा मुलगा अशा 6 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
त्याचप्रमाणे याच व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्तींनी खाजगी लॅब मधून आपली टेस्ट करून घेतली असता सेक्टर 26, वाशी येथे राहणा-या व एपीएमसी दाणा मार्केट मध्ये सेल्समन म्हणून काम करणा-या एका व्यक्तीची तसेच सेक्टर 11, कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या व एपीएमसी दाणा मार्केटमध्ये ब्रोकर असणा-या 36 वर्षीय व्यक्तीची अशा 2 व्यक्तींचेही कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
|