सेक्टर 19 बी कोपरखैरणेगाव येथे विशेष स्वच्छता मोहीम
कोपरखैरणे सेक्टर 19 बी भागातील एका खाजगी भूखंडावर झाडेझुडपे तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा असल्याने शहर स्वच्छतेला बाधा पोहोचत असून त्या ठिकाणी वाढलेल्या झाडाझुडुपांमुळे साप व इतर जनावरांचा वावर त्यासोबतच त्या परिसरात अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रकार घडत असल्याचे कोपरखैरणे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे विभाग कार्यालयास कळविण्यात आले होते.
त्या अनुषंगाने कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सुनील काठोळे यांनी या बाबीची तातडीने दखल घेत या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचे निश्चित केले. त्यास अनुसरून स्वतः विभाग अधिकारी यांच्यासह स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, साफसफाई व कचरा वाहतूक पर्यवेक्षक आणि स्वच्छताकर्मी यांनी एकत्रितपणे स्वच्छता मोहीम राबवित सेक्टर 19 बी कोपरखैरणेगाव येथील परिसर स्वच्छ केला. या परिसर स्वच्छतेमुळे या भागाचा कायापालट झाला असून नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Published on : 03-05-2024 09:54:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update