बेघर, निराधार, मजूर, विस्थापित कामगार, गरजू नागरिकांना मदतकार्य
l विभागवार निवारा केंद्र एकूण संख्या :- 17 + 1 (सिडको एक्झि.सेंटर)
l सद्यस्थितीत कार्यान्वित निवारा केंद्र संख्या :- 05 + 1 (सिडको एक्झि.सेंटर)
l निवारा केंद्रातील एकूण नागरिक संख्या :- 389
l नमुंमपा शाळा क्र. 01, बेलापूर निवारा केंद्र नागरिक संख्या :- 31
l नमुंमपा निवारा केंद्र, आग्रोळी, से.11, बेलापूर निवारा केंद्र नागरिक संख्या :- 20
l नमुंमपा शाळा क्र. 6, से. 6, सारसोळे, नेरूळ निवारा केंद्र नागरिक संख्या :- 12
l नमुंमपा निवारा केंद्र, घणसोली निवारा केंद्र नागरिक संख्या :- 48
l नमुंमपा शाळा क्र. 102, से. 14, ऐरोली निवारा केंद्र नागरिक संख्या :- 61
l सिडको एक्झिबिशन सेंटर, से.30, वाशी निवारा केंद्र नागरिक संख्या :- 217
l सद्यस्थितीत कार्यान्वित सहा निवारा केंद्रात असलेल्या 389 व्यक्तींना अल्पोपहार, चहा आणि सकाळचे व दुपारचे जेवण महानगरपालिकेने स्थापित केलेल्या सेक्टर 19, नेरूळ येथील कम्युनिटी किचनव्दारे दिले जात आहे.
l याशिवाय कोव्हीड - 19 आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्रमांकावर तसेच विभाग कार्यालयांमध्ये आलेल्या मागणीनुसार महानगरपालिका क्षेत्रातील गरजू मजूर, कामगार, विस्थापित कामगार, बेघर नागरिक, काळजी घेण्यास कोणी नसलेल्या दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक अशा 27496 व्यक्तींना आज स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या सहयोगाने जेवण दिले गेले आहे.
l महानगरपालिकेच्या वतीने 8 विभागांमध्ये 17 ठिकाणी निवारा केंद्रांचे विभागवार नियोजन करण्यात आले असून 1400 व्यक्तींच्या निवा-याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
l या निवारा केंद्रातील नागरिकांना अल्पोपहार व जेवण पुरविण्यासाठी 12 कम्युनिटी किचनचे नियोजन करण्यात आले आहे.
|