कोव्हिड - 19 आजचे अपडेट (23/04/2020)
l कोरोना पॉझिटिव्ह असलेले 3 रुग्ण कोरोना निगेटिव्ह झालेले असून बरे होऊन घरी परतलेले आहेत.
l आज 63 कोरोना टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाले. त्यामध्ये 51 रिपोर्ट निगेटिव्ह आणि 12 रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त.
l आज पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 12 l एकूण पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 97
l सायन मुंबई येथील सोमय्या हॉस्पिटल मधील 28 वर्षीय महिला डॉक्टरचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असून त्या सेक्टर 17 वाशी येथील रहिवाशी आहेत. त्या सोमय्या हॉस्पिटलमध्ये कोव्हिड - 19 रुग्णांवरील उपचाराचे काम करीत होत्या व त्यांस सोमय्या हॉस्पिटलमध्येच ॲडमिट आहेत. सदरचे क्षेत्र कन्टेनमेन्ट झोन म्हणून जाहिर करण्यात येत असून या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
l भायखळा मुंबई येथील प्रिंस अलीखान हॉस्पिटल मधील 37 वर्षीय डॉक्टरचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असून ते सेक्टर 50 सिवूड नेरुळ येथील रहिवाशी आहेत. त्यांना वाशी येथील हिरानंदानी फोर्टीज हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सदरचे क्षेत्र कन्टेनमेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात येत असून या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
l घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमधील 52 वर्षीय सिस्टर इंचार्ज महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असून त्या सेक्टर 9 सानपाडा येथील रहिवाशी आहेत. त्यांना राजावाडी हॉस्पिटल येथेच ॲडमिट करण्यात आलेले असून त्यांचे रहिवाशी क्षेत्र कन्टेनमेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात येत असून या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
l सेक्टर 9 वाशी येथील एका घरातील 3 व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले होते. त्यांच्याच कुटुंबातील क्वारंटाईन असलेल्या आणखी एका 34 वर्षीय महिलेचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असून सदरचे क्षेत्र यापूर्वीच कन्टेनमेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे.
l अर्जुनवाडी नोसिल नाका येथील 21 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झालेल्या 26 वर्षीय युवकाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचेही स्वॅब सँपल घेतले असता त्यांच्या 60 वर्षीय वडीलांचेही आज कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 19 कोपरखैरणे येथील दि. 20 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झालेल्या 22 वर्षीय युवकाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचेही स्वॅब सँपल घेतले असता त्याच्या 23 वर्षीय बहिणेचेही कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l दिवागांव ऐरोली येथील दि.17 एप्रिल रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झालेल्या बँक मॅनेजरच्या संपर्कातील व्यक्तींचेही पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तीच्या 36 वर्षीय भावाचेही कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l दि.20 एप्रिल रोजी सॅन्डोज कामगारांपैकी 2 नवी मुंबई निवासी कामगारांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते. त्यामधील आणखी एका 27 वर्षीय पुरुष कामगाराचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. सदर व्यक्ती कंपनीमार्फत 7 एप्रिल पासून तुर्भे येथील योगी हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे.
l महापे एम.आय.डी.सी.तील बँकींग क्षेत्राशी संबंधीत आय.टी. कंपनीतील एकूण 21 कर्मचा-यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते. त्यामधील सेक्टर 8 कोपरखैरणे येथे राहणा-या सिक्युरिटी गार्डच्या इमारतीतील 44 वर्षीय महिलेचेही कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. सदरचे क्षेत्र यापूर्वीच कन्टेनमेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे.
l सेक्टर 12 कोपरखैरणे येथील 35 वर्षीय युवकाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून हा युवक 6 मार्च रोजी गुजरातहून आला होता. यास 15 एप्रिल रोजी घशात खवखव जाणवू लागल्याने नागरी आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आल्यानंतर त्याची लक्षणे पाहून स्वॅब टेस्टींग केले असता त्याचे टेस्ट रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. सदरच्या क्षेत्रात निर्जंतुकीकरण करण्यात येत असून सदर परिसर क्वारंटाईन करण्यात येत आहे.
l कोपरखैरणे विभागातील बोनकोडे गांव येथील 37 वर्षीय व्यक्ती 22 मार्चपासून घरीच असून 18 एप्रिलला तापसदृष्य स्थिती जाणवल्याने नागरी आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आल्यानंतर त्याची लक्षणे पाहून स्वॅब टेस्टींग केले असता त्याचे टेस्ट रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. सदरच्या क्षेत्रात निर्जंतुकीकरण करण्यात येत असून सदर परिसर क्वारंटाईन करण्यात येत आहे.
l शिवाजी नगर नेरुळ येथील 60 वर्षीय व्यक्ती 15 एप्रिल रोजी मुंबईहून आल्यानंतर घरीच क्वारंटाईन होते. तथापी त्यांस तापसदृष्य लक्षणे जाणवू लागल्यानंतर नागरी आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आल्यानंतर त्याची लक्षणे पाहून स्वॅब टेस्टींग केले असता त्याचे टेस्ट रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. सदरच्या क्षेत्रात निर्जंतुकीकरण करण्यात येत असून सदर परिसर क्वारंटाईन करण्यात येत आहे.
|