कोव्हिड - 19 आजचे अपडेट (26/04/2020)
l आज 164 कोरोना टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाले. त्यामध्ये 141 रिपोर्ट निगेटिव्ह आणि 23 रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त.
l आज पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 23 l एकूण पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 131
l विभागनिहाय कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या : बेलापूर - 9, नेरूळ - 4, वाशी - 2, तुर्भे - 4,
कोपरखैरणे - 2, घणसोली - 2.
l प्रिन्स अली खान रूग्णालय, भायखळा येथील कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरच्या निकटच्या संपर्कातील सेक्टर 50, सीवूड्स, नेरूळ येथील निवासस्थानी रहात असलेल्या त्यांच्या कुटूंबातील 6 पुरूष आणि 3 महिला अशा 9 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
l सेक्टर 23, कोपरखैरणे येथील भाजी विक्रेता असणा-या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट घेण्यात आले होते. त्यामध्ये त्यांच्या शेजारी राहणा-या 37 वर्षीय व्यक्तीचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून सदर व्यक्ती महापे एम.आय.डी.सी. येथे वेल्डींगचे काम करते.
l महापे एम.आय.डी.सी. येथील आयटी बँकींग क्षेत्रातील संबंधित कंपनीतील 19 कर्मचा-यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते व त्यामधील 8 कर्मचारी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी होते. त्याच कंपनीतील आणखी एका 26 वर्षीय कर्मचा-याचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून सदर व्यक्ती सेक्टर 6 घणसोली येथील रहिवाशी आहे.
l शिवाजीनगर, नेरूळ येथील 60 वर्षीय व्यक्तीचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते. त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब टेस्टींग केले असता त्यांच्या घराशेजारी राहणा-या 38 वर्षीय पुरूष व 32 वर्षीय महिला अशा पतीपत्नींचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
l सेक्टर 2 कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या 28 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत .सदर महिला शताब्दी हॉस्पीटल, मुंबई येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असून त्या हॉस्पिटलमधून नवी मुंबईत ये-जा करीत होत्या. त्यांस घाटकोपर येथील राजावाडी रूग्णालयात ॲडमीट करण्यात आले आहे.
l तळवली गाव येथील गृहिणी असणा-या 21 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असून सदर महिलेचे पती मुंबईत चेंबूर - गोवंडी भागात मंडप डेकोरेटर्सचे काम करतात. त्यांच्या निकटच्या संपर्कातील 8 व्यक्तींचे स्वॅब सँपल घेण्यात आलेले आहेत.
l सेक्टर 1 ए शिरवणे नेरूळ येथील रहिवाशी असणा-या 55 वर्षीय पोलीस हवालदारांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले असून ते मुंबईतील बैंगणवाडी पोलीस ठाण्यात 23 एप्रिलला ताप येऊन दवाखान्यात जाईपर्यंत कार्यरत होते. त्यांच्या निकटवर्तीय 4 व्यक्तींचे स्वॅब सॅम्पल घेण्यात आलेले आहेत.
l सेक्टर 5 सानपाडा येथील निवासी व एका राष्ट्रीय वृत्तचित्रवाहिनीचे मुंबई येथे कार्यरत 35 वर्षीय कॅमेरामन आणि त्यांची 30 वर्षीय पत्नी यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांची पत्नी गरोदर असल्याने तपासणीसाठी गेले असताना त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. सदर पती-पत्नीचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 19, तुर्भे येथील स्वीकार हॉटेलमधील 25 वर्षीय वेटरचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असून सदर वेटर 16 मार्च रोजी बिहारवरून लखनौ - टिळकनगर ट्रेनने मुंबईत व नंतर नवी मुंबईत आला आहे. 23 तारखेला त्यास लक्षणे जाणवू लागल्याने त्याचे स्वॅब टेस्टींग करण्यात आले व त्याचे पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. सदरचे क्षेत्र कन्टेनमेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात येत असून या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
l सेक्टर 20, नेरूळ येथील तेरणा रूग्णालयातील क्वार्टरमध्ये राहणा-या रूग्णालयातील 30 वर्षीय वॉर्डबॉयचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले असून रूग्णालयात 20 एप्रिलला उपचार घेणा-या मानखुर्द, मुंबई येथील पॉझिटिव्ह रूग्णामुळे त्यांस कोरोना लागण झाली असण्याचा संभव आहे. त्यामुळेच रूग्णालयामध्येच 20 एप्रिलपासून त्यांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते. त्यामधील सदर वॉर्डबॉयचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l इंदिरानगर, तुर्भे येथील रहिवाशी असणा-या 31 वर्षीय व्यक्तीचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून सदर व्यक्ती तुर्भे एम.आय.डी.सी. मधील झोॲटिक फार्मासिटीकल कंपनीत हाऊसकिपींगमध्ये काम करीत आहे. त्यांस 21 एप्रिलला ताप येऊन तो औषधोपचाराने बरा न झाल्याने स्वॅब टेस्टींग केली असता त्यांचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
l सेक्टर 11 जुहूगांव येथील 33 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून सदर व्यक्ती फ्लिपकार्ट कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करीत आहे. त्यांस 23 एप्रिल रोजी तापाची लक्षणे जाणवू लागल्यानंतर त्यांची स्वॅब टेस्ट घेतली असता कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले असून त्याने मागील 14 दिवसांच्या काळात डिलिव्हरी केलेल्या पत्त्यांची यादी काढून तपासणी करण्यात येत आहे.
l सेक्टर 16 बी, वाशी येथील गृहिणी असणा-या 40 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. या महिला सामाजिक कार्यकर्त्या असल्याने या कालावधीत नेरूळ व वाशी भागात विविध उपक्रमांत सहभागी होत्या. त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब सॅम्पल घेण्यात येत आहेत.
|