आरटीई ऍ़क्ट, 2009 अंतर्गत आरक्षित 25 टक्के प्रवेशाची ऑनलाईन प्रकिया सन 2020-21
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 12(1) नुसार सन 2020-21 नुसार अल्पसंख्यांक शाळा वगळून मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांमध्ये वंचित गटातील व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली किंवा पूर्वप्राथमिक वर्गात 25% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे.
त्यानुसार सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामधील नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रवेशासाठीच्या पात्र शाळांची यादी, शाळेचा प्रवेशस्तर, आर.टी.ई. प्रवेशाची क्षमता व मदत केंद्रांची यादी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच सदर माहिती शासनाच्या www.student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज दिनांक 12/02/2020 ते 29/02/2020 पर्यंत ऑनलाईन स्वरूपात www.student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दाखल करावयाचे आहेत.
अर्ज दाखल करतांना पालक एका पेक्षा जास्त शाळा Select करू शकतात. ऑनलाईन दाखल करावयाच्या अर्जाच्या वेळी पालकांनी कोणतेही कागदपत्रे Upload करावयाची नाहीत. ज्या शाळेत प्रवेश निश्चित झालेला असेल त्या शाळेत प्रवेश घेणे बंधनकारक राहील. प्रवेश न घेतल्यास प्रवेश प्रक्रियेमधील हक्क संपुष्टात येईल, याची पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 13-02-2020 12:42:51,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update