*363 घरकाम करणा-या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्सनी कोव्हीड लसीकरणाचा घेतला लाभ*
*सेवाकार्य करताना नागरिकांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क येणा-या कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन केले जात आहे. त्यामध्ये आज घरोघरी जाऊन स्वयंपाक, स्वच्छता असे घरकाम करणा-या 363 पॉटेंशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींचे आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली रूग्णालयांत कोव्हीड लसीकरण करण्यात आले.*
*यामध्ये सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथे 106, माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नेरूळ येथे 180 तसेच राजमाता जिजाऊ रूग्णालय ऐरोली येथे 77 अशा एकूण 363 घरकाम करणा-या व्यक्तींनी कोव्हीड लस घेतली.*
ज्या प्रमाणात कोव्हीड लस उपलब्ध होतात त्यानुसार दैनंदिन लसीकरणाचे नियोजन केले जात असून ते करत असताना दैंनंदिन जीवनात विविध प्रकारचे सेवाकार्य करताना ज्या व्यक्तींचा नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येतो अशा कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या पॉटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींकरिता विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन केले जात आहे.
25 जूनपासून पॉटँशिअल सुपरस्प्रेडर्स असणा-या विविध घटकांचे लसीकरण केले जात असून आजतागायत मेडिकल स्टोअर्समधील 390 कर्मचारी, रेस्टॉरंटमधील 1407 कर्मचारी, सलून / ब्युटी पार्लर मधील 639 कर्मचारी, पेट्रोल पंपावरील 282 कर्मचारी तसेच 2323 रिक्षा - टॅक्सी चालक, 184 घरगुती गॅस वितरण करणारे कर्मचारी तसेच 1503 सोसायट्यांचे वॉचमन अशा 6728 पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींचे लसीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये आज 363 घरकाम करणा-या व्यक्तींची भर पडलेली आहे.
या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्समध्ये घरोघरी जाऊन स्वयंपाक, स्वच्छता आदी सेवा पुरविणा-या व्यक्तींचेही लसीकरण करण्याच्या अनुषंगाने आज महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार घरकाम करणा-या व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या 3 रूग्णालयांत विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्साही प्रतिसाद लाभला. उद्या 3 ऑगस्ट रोजीही आज लस घेऊ न शकलेल्या घरकाम करणा-या उर्वरित व्यक्ती लस घेऊ शकणार असून त्यांनी लसीकरणासाठी येताना सोबत आपले आधारकार्ड तसेच ज्या घरामध्ये काम करतात त्या सोसायटीच्या लेटरहेडवर त्यांचे नाव असलेले पत्र आणावयाचे आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 6 लाख 76 हजार 202 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतलेला असून 2 लाख 17 हजार 66 नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता महानगरपालिका प्रयत्नशील असून त्यानुसार लसीच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरणाचे दैनंदिन नियोजन केले जात आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षावरील नागरिक यांना प्राधान्य दिले जात असून विविध सेवा पुरविताना मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असणा-या कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या व्यक्तींच्या (Potential Superspreaders) लसीकरणाकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी कोव्हीड लस घेतली असली तरी दैनंदिन जीवनात मास्कचा वापर, चेह-याला स्पर्श न करणे, वारंवार हात धुवून स्वच्छ राखणे ही आपली नियमित सवय बनवावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 02-08-2021 15:58:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update