Amazon मार्फत सीएसआर निधीतून अत्याधुनिक 'रिमोट पेशंट मॉनिटरींग सिस्टिम' प्रदान
नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी कोव्हीड 19 विरोधातील लढ्यासाठी केलेल्या सहकार्याच्या आवाहनास अनुसरून विविध उद्योगसमुह, स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने गरजेच्या साहित्य, उपकरणे स्वरूपात मोठ्या प्रमाणावर मदत लाभली आहे.
यामध्ये सी.एस.आर. निधीतून उद्योजकांमार्फत देण्यात येणा-या विविध आरोग्यविषयक उपकरणांमध्ये ॲमेझॉनच्या वतीने 'रिमोट पेशंट मॅनिटरींग सिस्टिम' हे अत्यंत आधुनिक असे वैद्यकीय उपकरण देण्यात आले आहे. या उपकरणामध्ये रूग्णाच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता डॉक्टरांना रूग्णाचा हार्टरेट, एसपीओ टू, इसीजी, ब्लडप्रेशर याचे प्रमाण मोजण्याची सुविधा असून संसर्गातून प्रसारित होणा-या कोव्हीड 19 च्या तपासणीसाठी हे उपकरण अत्यंत सुरक्षित व लाभदायक आहे.
या अत्याधुनिक उपकरणात 5 मॉनिटर्स व टॅबची व्यवस्था असून हे मॉनिटर्स लावलेल्या ठिकाणी रूग्ण आल्यास त्याच्या आवश्यक शारीरिक तपासण्या करण्यात येऊन त्यांचे निरीक्षण टॅबव्दारे लांबून अगदी दुस-या खोलीतूनही डॉक्टर करू शकतात. त्यामुळे कोव्हीड 19 विषयक तपासणीमध्ये सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात 'ॲमेझॉन'च्या वतीने कन्सर्न इंडिया फाऊंडेशन यांच्या सहयोगाने देण्यात आलेली साधारणत: 7 लक्ष किंमतीची 'रिमोट पेशंट मॉनिटरींग सिस्टिम' ही अत्याधुनिक यंत्रप्रणाली कोव्हीड विरोधातील लढ्यात अत्यंत योग्य व फायदेशीर ठरणारी आहे.
Amazon मार्फत सीएसआर निधीतून अत्याधुनिक 'रिमोट पेशंट मॉनिटरींग सिस्टिम' प्रदान
Published on : 25-06-2020 14:14:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update