CBSE शाळांतील वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सन 2020-21
मा. महासभेच्या मान्यतेने नवी मुंबई महानगरपालिका मार्फत कोपरखैरणे, सेक्टर-11 येथे सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सदर शाळेमध्ये सन 2020-21 साठी नर्सरी व इयत्ता 5वी ते 8वी करीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेश पुर्णत: नि:शुल्क असल्याने या सुविधेचा लाभ पालकांनी घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. प्रवेशाबाबतचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
वयोगट
|
:
|
1) नर्सरी : 3+ वर्षे पूर्ण (30 सप्टेंबर 2020 रोजीचे)
2) इयत्ता 5वी : 10+ वर्षे पूर्ण (30 सप्टेंबर 2020 रोजीचे)
3) इयत्ता 6वी : 11+ वर्षे पूर्ण (30 सप्टेंबर 2020 रोजीचे)
4) इयत्ता 7वी : 12+ वर्षे पूर्ण (30 सप्टेंबर 2020 रोजीचे)
5) इयत्ता 8वी : 13+ वर्षे पूर्ण (30 सप्टेंबर 2020 रोजीचे)
|
प्रवेश संख्या
|
:
|
प्रती वर्ग 60 विद्यार्थी
|
आवश्यक कागदपत्रे
|
:
|
पाल्याचा जन्मदाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड व वडिलांचा रहिवासी पुरावा, शिकत असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट.
|
प्रवेश घेण्याचे ठिकाण
|
:
|
उक्त नमूद शाळेतुन नि:शुल्क प्रवेश अर्ज दिनांक 28/02/2020 पर्यंत (वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत) उपलब्ध आहेत. पालकांनी सदर अर्ज आवश्यक कागद पत्रांसह दिनांक 29/02/2020 पर्यंत संबंधित शाळेत सादर करावे.
|
सुविधा
|
:
|
सुसज्य शाळा इमारती, प्रशिक्षित शिक्षक, नि:शुल्क शैक्षणिक साहित्य.
|
प्रवेशासाठी आवश्यक अटी :
- प्रवेशासाठी शाळेपासून 1 कि.मी. चे आत अंतरावर राहणा-या विदयार्थ्यांना प्राधान्य देणेत येईल.
- 30 सप्टेंबर 2020 रोजी उक्त नमूद केल्याप्रमाणे वय वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- इयत्ता 5वी ते 8वी प्रवेशाकरीता विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या CBSE शाळेत शिकत असलेला असावा.
- इयत्ता 5वी ते 8वी करीता प्रत्येक वर्गात 20 पेक्षा जास्त विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास नैसर्गिक वाढीने वर्ग सुरू राहतील.
- शिक्षण नि:शुल्क असुन बस सेवा उपलब्ध असणार नाही.
- शाळा प्रवेशाचे सर्व अधिकार मा.आयुक्त, नमुंमपा यांचे स्वाधीन राहतील.
Published on : 18-02-2020 13:25:03,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update